प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी तरुण राहता येत नाही त्यांना कधी ना कधी म्हातारपणाचा सामना करावा च मागतो आणि त्यासोबतच येणाऱ्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपल्याही घरात कुणी वृध्द लोकं असतील तर त्यांच्या भावना समजून आपल्याला त्यांची योग्यरित्या काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु वृद्धांची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर आम्ही तुम्हाला या article च्या माध्यमातून हेच सांगणार आहोत की वृद्धांची काळजी कशी घ्यावी.
वृद्धांची काळजी घेण्याची गरज का आहे?
म्हातारपण जसं जसं जवळ जवळ येत असते तसं तसं शरीर शारीरिकदृष्ट्या देखील कमकुवत होत जाते. कोणत्याही कामात त्यांच्या पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही, हाडांची आणि स्नायूंची ताकद कमी होऊ लागते, दृष्टी कमकुवत होते, शरीरातील अनेक अवयव नीट काम करत नाहीत.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वृद्धांची काळजी घेणे अधिक गरजेचे वाटायला लागते. वृद्ध व्यक्तींना एकाच वेळी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागतात तर त्या कोण कोणत्या समस्या आहेत हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. कारण जो पर्यंत आपल्याला त्यांच्या समस्या कळणार नाही तो पर्यंत आपण त्यांची योग्यरित्या काळजी घेण्यास असमर्थ राहू.
सांधे दुखायला लागणे:
जस जसे आपले वय वाढत जाते तस तसे आपली हाडे कमकुवत व्हायला लागतात आणि त्यामुळेच सांधे दुखणे सुरू होते.
अन्न पचण्यात अडचण येणे:
माणसाचे वय वाढले की आपसूकच त्यांची पाचन क्रिया देखील कमकुवत व्हायला लागते आणि त्यामुळे त्यांना अन्न पचन करण्यास त्रास व्हायला लागते.
हृदयविकाराची समस्या उद्भवणे:
हृदय विकार होणे तर आता सर्व सामान्य झालेले आहे परंतु या विकाराचा प्रभाव जास्त प्रमाणात वृद्धांना होत असते त्यामुळे देखील त्यांची काळजी घेणे अती महत्वाचे ठरते.
लवकर थकवा येणे:
आपणच थोडे वजनी काम केले की थकवा यायला सुरवात होते तर वृद्धांची क्षमता तर त्यापेक्षा कमी असते त्यामुळे त्यांना आपल्या पेक्षा लवकर आणि जास्तीत जास्त प्रमाणात थकवा येत असते.
हाडे कमजोर होणे:
जस जसे वय वाढते तसतशी शरीराची काम करण्याची क्षमताही कमी होत जाते आणि याचाच थेट परिणाम वृद्धांच्या हाडांवर होत असते आणि त्यामुळेच त्यांची हाडे वयोमानानुसार कमजोर व्हायला लागतात.
डोळ्यांना कमी दिसणे:
ही समस्या आजच्या तरुणांमध्ये अधिक दिसून येत असली तरी, म्हातारपणात दूरदृष्टी वयानुसार कमी होत जाते आणि यात काही आश्चर्य नाही. यामुळे त्यांना प्रसंगी डोळ्याची शस्त्रक्रिया देखील करावी लागते.
रक्तदाब वाढणे किंवा कमी होण्याची समस्या होणे:
वाढत्या वयाबरोबर रक्तदाबाची समस्या अनेक वृद्धांना भेडसावत असते आणि त्यांना औषधोपचार करूनही लवकर आराम मिळत नाही. तर त्यांना रक्तदाबाची औषधी आयुष्यावर घ्यावी लागते असते.
ॲसिडीटी ची समस्या:
वाढत्या वयानुसार त्यांची पाचनक्रिया कमी झाल्यामुळे त्यांना ॲसिडीटी ची समस्या देखील भेडसावत असते. आणि त्यामुळे कित्येकदा त्यांच्या छाती मध्ये देखील वेदना होत असतात.
झोप न लागणे:
झोपेच्या समस्येमुळे वृद्धच नाही तर तरुण देखील त्रस्त आहे. परंतु तरुण विनाकारण मोबाईल चालवत बसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत परंतू वृद्धांना रात्री लवकर झोपच लागत नाही आणि सकाळी लवकर जाग येते त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होता नाही. त्यामुळे त्यांना चीड चिडेपणा होत असते शिवाय त्यांचा संपूर्ण दिवस देखील आळशीपणाने भरलेला असतो.अशा अनेक समस्या लक्षात घेऊन वृद्धांची काळजी घेणे महत्वाचे ठरते.
वृद्धांची काळजी कशी घ्यावी?
तुम्हाला वृद्धांच्या समस्यांबद्दल तर पुरेशी माहिती मिळाली आहे तर आता आपण पाहणार आहोत की वृद्धांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना वरील समस्यांपासून दूर सारून त्यांना निरोगी कसे ठेवावे याबद्दल सांगणार आहोत.
मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवावे:
त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ते सर्वप्रथम याचा प्रभाव त्यांच्या मानसिक आरोग्यावर पडत असते, त्यामुळे त्यांच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीने याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष ठेवणे महत्वाचे ठरते. लहान सहान गोष्टी विरण्याच्या तक्रारी, ट्रॅक गमावणे आणि चालताना तोल सांभाळता न येणे इत्यादी समस्यांवर काळजीपूर्वक लक्ष घालून त्यांना एकटे कुठेही बाहेर जाऊ देऊ नका.
तुमच्या डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्या:
जर तुमच्या घरातील एखाद्या वृद्ध सदस्याची तब्येत नेहमी बिघडत असेल तर तुम्हाला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण त्रासाच्या वेळी डॉक्टरच ते समजून घेऊन त्यानुसार औषध देऊ शकतात त्यांना लवकर आराम मिळण्यास मदत होते. वृद्धांसाठी नेहमी नेहमी डॉक्टर बदलू नये कारण तुम्ही जेव्हा जेव्हा डॉक्टर बडलवित असता तेव्हा तेव्हा ते डॉक्टर त्यांच्या औषधी सुद्धा बदलवत असतात त्यामुळे त्या वेग वेगळ्या औषधांचा वाईट परिणाम पडण्याची दाट शक्यता असते.
वृद्धांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा:
वृद्धापकाळात सर्वात त्रास कुठला होत असेल तर तो एकटेपणाचा होत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या कामात कितीही जरी व्यस्त असाल तरी देखील आपल्या कामातून थोडा वेळ काढून मिळेल तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवत चला, त्यांची तब्येत विचारत चला, त्यांनी त्यांच्या औषधी वेळेवर नीट घेतल्या किंवा नाही याची विचारपूस करत चला आणि सायंकाळी त्यांच्यासोबत थोडं फिरायला देखील जात जा त्यामुळे त्यांना एकटेपणा वाटणार नाही.
वृध्दांना ठरवलेल्या वेळेवर जेवण देत चला:
आपणच कित्येकदा कामामुळे वेळेवर जेवण केले नाही तर आपल्याला त्रास होत असतो तर वृद्धांना तर त्याच्या जास्त त्रास होईल त्यामुळे त्यांना नियमितपणे ठरवलेल्या वेळेत जेवण देत चला कारण वेळेवर जेवण न केल्यास त्यांना झोपेचा त्रास होऊ शकतो शिवाय यामुळे त्यांना आम्लपित्ताचा त्रास सुद्धा होत असती त्यामुळे त्यांना त्यांच्या ठरवलेल्या वेळेवर जेवण देत चला.
वृध्दांसाठी केअर टेकर ठेवा:
आपण 24 तास त्यांच्या सोबत राहू शकत नाही त्यामुळे त्यांच्यावर नीट लक्ष देऊ शकत नाही त्यामुळे वृद्धांची काळजी घेण्यासाठी एका केअरटेकरची नियुक्ती करा त्यामुळे तो त्यांची चांगली काळजी घेईल आणि त्यांना वेळेवर अन्न आणि औषधे देत राहील. परंतू तुम्ही नियुक्त केलेला केअर टेकर चांगला आणि प्रेमळ असायला हवा याची तुम्हाला दक्षता घ्यावी लागेल.
वृद्धांना निरोगी राहण्यास मदत करा:
वृद्धांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहणे फार गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना नियमितपणे व्यायाम आणि योगासने करण्यास प्रवृत्त करत रहा आणि त्यांच्यासोबत तुम्ही देखील व्यायाम आणि योगासने करत रहा यामुळे तुमच्यासोबत त्यांचे सुद्धा मानसिक आणि शारीरिक आरोग्य आनंदी राहील आणि शिवाय त्यांचा एकटेपणा घालवण्यास मदत होईल. व्यायाम आणि योगासने केल्यामुळे त्यांचे आजार दूर होतील आणि ते निरोगी राहतील.
वृद्धांची काळजी घेणे खूप महत्वाचे असते आणि काळजी घेणाऱ्याने व्यक्तीची गरजा समजून घेतली पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तर त्यांना त्यांची दिनचर्या देखील ठरवून द्या जेणेकरून त्यांचा दिनक्रम व्यवस्थित राहील आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील वृद्धांची काळजी घेऊ शकता.